एका बाजूने लागलेली आग मी माझ्या सर्व बाजूंनी लावून घेतली.
आग मला विझवता येत नव्हती असं नाही,
पण ती आग मला तेवढीच प्रिय होती...
म्हणूनच मी जळत आहे.
जळून राख नाही, तर काहीतरी उजळणार मी.
माहित नाही काय उजळणार आहे,
पण जळून राख होण्याआधी काहीतरी उजळणार मी.
कारण आगेला हवं असतं उजळणं राख होण्याआधी.
राख तर होणारच सगळ्यांची...
पण त्याचीही एक वेळ असते.
म्हणूनच राख होईल कधीतरी त्या उजळणर्या सुर्य अणि चंद्राची
No comments:
Post a Comment