Showing posts with label #Marathi. Show all posts
Showing posts with label #Marathi. Show all posts

Saturday, October 18, 2025

अंतर आवाज़..

काही मिळवण्याच्या प्रयत्नात जीवन जगताना अशी वेळ जीवनात बऱ्याच वेळा आली की, खूप प्रयत्न करूनही ज्या गोष्टीच्या मागे मी वेड्यासारखा धावत होतो, ती गोष्ट मला मिळतच नव्हती.

अशा त्या प्रत्येक वेळी मन खूप खिन्न व्हायचं — असं का होत आहे? किंवा कुठे मी चुकतोय? — ह्याबद्दल काहीच समजायचं नाही.

अशाच त्या परिस्थितीत, एका वेळी माझ्या आतूनच एक आवाज मला ऐकू आला. तो म्हणत होता —
“तुझा जन्म काही मिळवण्यासाठी नाही झाला.
तुला ह्या आयुष्यात काहीही मिळणार नाही, ज्ञान व अनुभव सोडून.
तुझा जन्म काही देण्यासाठी झाला आहे.
तर, तू शोध — असं काय आहे तुझ्यामध्ये, जे तू इतरांना देऊ शकशील;
आणि विचार कर, की ते तू इतरांना कशाप्रकारे देऊ शकशील...”

हा वरील आवाज ऐकल्यानंतर मन थोडं शांत झालं आणि लगेच ह्या गोष्टीचं भान आलं की —
“मन जर शांत असेल, तर ह्या जिवाला आणखी काही लागत नाही.”
“शांत मन हेच मुक्तीचा मार्ग शोधू शकतं.”

जर त्या आवाजाप्रमाणे,
जर मी (किंवा इतर कोणीही) काही देण्याच्या हेतूने आयुष्यभर संघर्ष करत राहीला,  तर काही गमवण्याच्या दुखापासून मी नेहमी दूर राहू शकेन.

आणि जर गमवण्याची भीतीच नसेल, तर पुढील प्रत्येक प्रयत्न मी चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे करू शकेन.
मन तर शांतच असेल, जेणेकरून इतर कुठल्याही गोष्टीची गरज भासणार नाही.
अपेक्षाच नसेल, तर अपेक्षा-भंगानंतरचा त्रास तर कोठून होणार!

आयुष्य हे देण्यासाठी की मिळवण्यासाठी — ह्या प्रश्नाचं उत्तर तर गवसले.

— गणेश नरवणे

स्वच्छंद उडू द्या..

कोणता मार्ग निवडायचा हा विचारही नको...

कोणताही मार्ग चालेल...

कोणतीही स्वप्नं चालतील...

आम्हाला मानपान काही नको,

ते तुम्ही तुमचंच वाटून घ्या...

आम्हाला फक्त इतरांसाठी काही करता येतंय का, ह्या विचारातच जगू द्या...

जर काही जमलेच, तर ते पूर्ण होण्यासाठी स्वच्छंद उडू द्या...

उंच त्या आकाशात, उंच उंच भरारी मारू द्या...

आम्हाला उडू द्या...

नभातल्या ढगात एक घर बांधू द्या...

आम्हाला स्वच्छंद उडू द्या...

पदवी…

बघता बघता कशी शब्दांशी मैत्री झाली माहित नाही..

कसे शब्द माझ्या भावना समजतात, माहिती नाही..

जेव्हा माझ्याकडे काही विशेष भावना असतात,

तेव्हा शब्दच माझ्या त्या भावना घेऊन कागदावर एक सुंदर घर बसवतात..

तसं बघितलं तर कागदावर एक शब्दांचा मजकूरच असतो,

त्याला कवितेची ही ‘पदवी’ तुम्ही रसिकच देता..

— गणेश

स्वार्थ...


जगी न कोणी कुणी कुणाचा,
जो तो पाही स्वार्थ आपुला.
या जगती जो जन्माला,
तो स्वार्थी होऊनच मेला.

व्याघ्र मन

व्याघ्र मन..


शरीर असेल जरी जणू काही वज्रासारखे

सोसावया शरीराला कधी जमते..

सरसावले मन पुढे सोसावया जे जे काही

आणि व्याघ्र मनाने ते सोसले

आणि व्याघ्र मनाने ते सोसले 

मुक्त अशी शक्ति

मला जन्मही नको

मृत्यूही नको

मला सुखही नको

दुःखही नको

यश नको

अपयशही नको

हा देहही नको

विचारही नको

स्वप्न नको

कसलीच इच्छा नको

मला भावना नको

संवेदना नको

मला जन्मही नको

मला मृत्यूही नको

मला व्हायचय अशी शक्ती

जी चांगलं काही करण्याच्या प्रयत्नात असते,

जी देवाला केलेल्या प्रार्थनेत असते,

अशी शक्ती जी देवाशी एकरूप असते,

अशी शक्ती जी नेहमी मुक्त असते.


– गणेश


Friday, October 17, 2025

कोण मी…

कोण मी…

माझा शत्रू पण मी…
माझा मित्र पण मी…
माझं धैर्य पण मी…
माझा रक्षक पण मी…
मला हवी असलेली गोष्ट पण मी…
मी शोधत असलेली गोष्ट पण मी…
मीच माझ्या विचारात…
मीच माझ्या स्वप्नात…
मीचमिचनाऱ्या पापण्यांच्या आत दडलेला पण मीच…
ध्यानात मी…
मानात मी…
श्वासात मी…
शब्दात मी…

ठाऊक नाही तरी पण आहे कोण मी… 

Tuesday, October 7, 2025

आग

एका बाजूने लागलेली आग मी माझ्या सर्व बाजूंनी लावून घेतली.

आग मला विझवता येत नव्हती असं नाही,
पण ती आग मला तेवढीच प्रिय होती...
म्हणूनच मी जळत आहे.

जळून राख नाही, तर काहीतरी उजळणार मी.
माहित नाही काय उजळणार आहे,
पण जळून राख होण्याआधी काहीतरी उजळणार  मी.

कारण आगेला हवं असतं  उजळणं राख होण्याआधी.

राख तर होणारच सगळ्यांची...
पण त्याचीही एक वेळ असते.

म्हणूनच राख होईल कधीतरी त्या उजळणर्‍या सुर्य अणि चंद्राची 

कोणी मला बनवल..

का आणि कुणी मला बनवल..

कधी केल मी कुणाच भल..

ऊध्वस्थ केली मी अनेक जीवने..

ऊध्वस्थ केली मी स्वप्ने..

मोडले संसार..

तोडले आधार..

सुख असो वा दुख होते माझीच आठवण..

म्हणे मोकळे होण्यासाठी येतो तुझ्या शरण..

काय मी पाहते

काय मी ..

असतो तो एक गोल गोंधळ, आणि तिरस्करांचाबेज़ार..

लाज वाटते स्वतहाची पाहता मोडून पडलेलेसंसार..

असतो मनी त्यांच्या नेहमी माझा आदर..

त्या पेक्षा बारा वाटतो मला सज्जनांनी केलेलाधिक्कार..

मी तरी काय करू, अशीच आहे मी दारू.. 

तू सहज रात

 तू सहज रात..

मी दिवस खडतर..

तू एक सरळ दिशा..

मी तिच दिशा हीन..

मी अनाड मी उनाड..

तू अल्लड नी स्वच्छंद..

तू माझ्या प्रयत्नांपलीकडे..

जीव माझा तूझ्या पलीकडे..

होता तुझे स्मरण..

मिटतात नकळत माझे नयन..

हारीले मी हारीले..

चित्त मी हारीले..

चित्त मी हारीले.. नित्य मी हारीले..